Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

470 0

जळगाव : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. जळगावमधून (Jalgaon News) एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चाळीसगावच्या मेहुणबारे येथील गिरणा नदीच्या पुलावरून एक खाजगी बस खाली कोसळली आहे. ही बस अहमदाबादवरून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!