Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

572 0

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आपल्या 10 शिलेदारांवर सोपवली आहे. चला तर मग या 10 शिलेदारांबद्दल जाणून घेऊया….

‘या’ 10 शिलेदारांवर जबाबदारी
संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई,राजन विचारे, चंद्रकांत खैरे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, अनंत गीते, विनायक राऊत, यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
संजय राऊत
उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)

अनंत गीते
कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण)

चंद्रकांत खैरे
मराठवाडा
(लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना)

खासदार अरविंद सावंत
पश्चिम विदर्भ
(लोकसभा मतदारसंघ बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ – वाशिम, वर्धा)

खासदार अनिल देसाई
पश्चिम महाराष्ट्र
(लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी)

आमदार भास्कर जाधव
पूर्व विदर्भ
(लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर)

खासदार विनायक राऊत
कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी, सिंधुदुर्ग

खासदार राजन विचारे
कोकण (ठाणे, पालघर)
(लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर)

आमदार रवींद्र वायकर
मराठवाडा
(लोकसभा मतदारसंघ नांदेड, हिंगोली, परभणी)

आमदार सुनील प्रभू
मराठवाडा, सोलापूर
(लोकसभा मतदारसंघ सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!