Dhule Bus Accident

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

426 0

जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात भीषण अपघात (Accident News) झाला आहे. घाटात मुसळधार पाऊस सुरू होता, मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार आणि अन्य एका वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार व अन्य वाहनांचा भीषण अपघात झाला झाला, या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत तर 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश गुलाबराव शिर्के, शिलाबाई प्रकाश शिर्के, वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी व पूर्वा गणेश देशमुख असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. जळगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!