मनोरंजन

Sa Re Ga Ma Pa Li’l Champs 2023 : कोपरगावच्या गौरीनं जिंकलं ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं विजेतेपद

मुंबई : ‘झी मराठी’ वरील यंदा ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं (Sa Re Ga Ma Pa Li’l Champs 2023) नवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या मधुर आवाजानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. या पर्वाचे लिट्ल चॅम्प्स सोशल मीडियावर देखील खूप गाजले. या पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक सो एक दमदार स्पर्धक सहभागी झाले होते. गायक,संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली भैसने माडे यांनी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली होती. तर गुरुजींच्या खुर्चीवर सुरेश वाडकर बसले होते.अनेक महिने चाललेल्या या पर्वाने काल सगळ्यांचा निरोप घेतला.

https://www.instagram.com/p/C0FAYR3r_Dk/?utm_source=ig_embed&ig_rid=88340248-ef7a-4d33-a759-165cd758235d

25 नोव्हेंबरला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला.‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ 2023 च्या ट्रॉफीवर कोपरगावच्या गौरी अलका पगारे हिने नाव कोरलं. खेडेगावातून आलेल्या गौरीने खूप संघर्ष करत महाअंतिम सोहळ्यात मजल मारली. गौरीने कधी संगीताचं शिक्षण देखील घेतलं नाही. पण आपल्या दणदणीत आणि खड्या आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली.

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ 2023 च्या महाअंतिम सोहळ्याला खास पाहुणे म्हणून लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे ‘लिटील चॅम्प्स टॉप 6’ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरीने बाजी मारत ही स्पर्धा जिंकली. गौरीला पारितोषिक म्हणून गौरीला 1,50,000 चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या झालेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी 1,00,000 चा चेक देण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे