वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलची (IPL 2024) आस लागली आहे. ही आयपीएल सुरु होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी आली आहे. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज जो रूटने येत्या आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तो पुढील कोणत्याही आयपीएल हंगामात खेळताना दिसणार नाही. जो रूटच्या या निर्णयामुळे त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मागच्याच हंगामात जो रुटने पदार्पण केले होते.
फ्रँचायझीने एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. इंग्लंडच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या रूटने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याला राजस्थान रॉयल्सने मिनी लिलावात विकत घेतले. 2023 च्या आयपीएलमध्ये रूटने फ्रँचायझीसाठी फक्त 3 सामने खेळले. आयपीएल 2024 च्या रिटेन्शन डेडलाइनच्या आधी ही बातमी आल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?
Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या
Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान
Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा
Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे