Delhi Crime

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

601 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीतून (Delhi Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्लीच नाहीतर संपूर्ण देश हादरला आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीने एका तरुणाची 60 वेळा चाकूने भोसकून हत्या केली आहे. एवढंच नाहीतर आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेहाच्या शेजारी डान्सदेखील केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

रस्त्यावर दरोडा टाकताना एका किशोरवयीन मुलावर चाकू हल्ला केल्याने दिल्ली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अल्पवयीन आरोपी मृतदेह एका अरुंद गल्लीत ओढतांना दिसत आहे. आरोपीने लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर वार केला. धक्कादायक म्हणजे आरोपीने मृत्यू झालेला असतानादेखील पीडित तरुणावर 60 वेळा चाकूने वार केले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आरोपी तरुणाच्या मानेवर वारंवार वार करताना दिसतोय. तसेच हल्लेखोर पीडितेच्या डोक्यावर अनेक वेळा लाथ मारताना देखील दिसतोय.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून अल्पवयीन आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. हत्येमागील हेतू दरोडा आहे. मुलाने प्रथम पीडितेचा गळा दाबला आणि जेव्हा तो बेशुद्ध झाला, तेव्हा आरोपींनी त्याच्याकडे सुमारे 350 रुपये लुटण्यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा वार केले. पीडित व्यक्तीला जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!