Gopichand Padalkar and jarange

Gopichand Padalkar : ‘बाबासाहेबांचं नाव नको, पण आरक्षण पाहिजे’, पडळकरांची जरांगेवर नाव न घेता टीका

644 0

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाने आंदोलन सुरु केले आहे. यादरम्यान आता धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘आरक्षण मागताय तर बाबासाहेबांचं नाव का घेत नाहीत? असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

नेमके काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत आरक्षण दिले. त्यामुळेच आमचे एकच साहेब बाबासाहेब आहे. पण काही पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी निर्माण केलेले जातीयवादी माणूस आरक्षण मागतो पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान द्यायला व त्यांचे नाव घ्यायला तयार नाही. आम्ही आज बाबासाहेबांमुळे आहोत हे आम्ही मान्य करतो, असं विधान पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला आता जरांगे पाटील काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!