Bhandara Viral Video

Bhandara Viral Video : ‘पाटलांचा बैलगाडा’ अन् अजित पवार गटाच्या सभापतीचा राडा; तरुणीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

641 0

भंडारा : भंडारा (Bhandara Viral Video) जिल्ह्यातील एका कार्यक्रमात तरुणीचा न्यूड डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता जिल्ह्यातून अजून घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सभापतींचा हा व्हिडिओ आहे. या प्रकरणी सभापतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बीड सीतेपार इथं लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात नृत्यांगणेवर पैसे उधळणे मोहाडी पं.स. सभापती आणि शौकिनांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिरोज गजभिये, (25), विक्की गायधने (25) आशिष देशकर (25) दुर्योधन बावनकुळे (30) विक्की जिभकाटे (25) (सर्व राहणार बीड/सीतेपार) तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सभापती रितेश वासनिक (35 रा. वरठी) आणि इतर एक जण अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात असभ्य वर्तन आणि सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओमुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!