Pune Crime

Pune Crime : पत्नीने केलेल्या मारहाणीत पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

970 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात खळबजनक घटना घडली आहे. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
निखील पुष्पराज खन्ना (वय-36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (वय-38 रा. वानवडी) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरगुती भांडणातून ही घटना घडली आहे. या घटनेनंतर रेणुका यांनी सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी असा परिवार आहे. वानवडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!