Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : शाहरूखच्या ‘डंकी’चं पहिलं धमाकेदार गाणं रिलीज

728 0

मुंबई : बॉलिवूडच्या किंग खाननं (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष गाजवलं. वर्षाच्या सुरूवातील तो पठाण बनून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर वर्षाच्या मध्यावर त्याचा जवान रिलीज झाला. दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता वर्षाचा शेवटही शाहरूख खानच्याच सिनेमानं होणार आहे. शाहरूखचा बहुप्रतिक्षित ‘डंकी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या या सिनेमातील पहिले पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘लुट पुट गया’ असं गाण्याचं नाव आहे. गाण्यात शाहरूख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू नाचताना दिसत आहेत. डंकी सिनेमात शाहरूख हार्डी ही भूमिका साकारणार आहे. तर तापसी पन्नू मनुच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार हिरानी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या गाण्यात अभिनेत्री तापसी पन्नूआणि शाहरूख खान यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

डंकी सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. तर अभिजात जोशी आणि कनिका ढिल्लो यांनी हे गाणं लिहिलं आहे. सिनेमात शाहरूख आणि तापसी यांच्याबरोबर अभिनेते धर्मेंद्र देखील प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे विक्की कौशल सिनेमात कॅमियो रोल करणार आहे. सिनेमाची निर्मिती हिरानी, गौरी खान आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा संपूर्ण देशात रिलीज होणार आहे. त्यामुळे आता पठाण आणि जवाननंतर डंकी सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!