Prof. Namdevrao Jadhav

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

1076 0

सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ती प्रा. नामदेवराव जाधव (Prof. Namdevrao Jadhav) यांची. पुण्यात नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाकडून काळे फासण्यात आल्याने ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. चला तर मग आज आपण प्रा. नामदेवराव जाधव यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत…

शरद पवार हे मराठा नसून ओबीसी आहेत. ते मराठा आरक्षणाची मारेकरी आहेत अशी विधाने करत त्यांनी शरद पवार यांचा बनावट जातीचा दाखला व्हायरल केल्यामुळे, ते शरद पवार गटाच्या ते निशाण्यावर आले होते. शरद पवार गटाकडून नामदेवराव जाधव यांनी माफी मागावी,अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता..आणि अखेर त्याच्या तोंडाला शरद पवार गटाकडून काळे फासण्यात आलं.काळे फासण्यात आलेले नामदेवराव जाधव यांचा जन्म पुरंदर येथे झाला असून ते स्वतःला मा साहेब जिजाऊंचे वंशज असल्याचे सांगतात.

नामदेवराव जाधव नंतर मुंबईत आले. आणि सरकारी नोकरी देखील करू लागले. पण मन रमत नसल्यामुळे त्यांनी सरकारी नोकरीला सोडचिठ्ठी देऊन, पुस्तके लिहायला सुरुवात केली आणि त्याचं बरोबर व्याख्यानेही देऊ लागले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा मोठा खप झाला. त्यानंतर त्यांना समाजात लेखक म्हणूनही मान्यता मिळाली. नंतर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.नामदेवराव जाधव हे मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत. ते युट्युब वरती स्वतःचे मोटिवेशनल व्हिडिओज अगदी सोप्या भाषेत बनवून पोस्ट करत असतात आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात.

प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेले पुस्तके
आर्ट ऑफ लीडरशीप (माहितीपर)
उद्योजक शिवाजी महाराज (व्यवस्थापनशास्त्र)
करोडपती (व्यवस्थापनशास्त्र)
खरा संभाजी (ऐतिहासिक)
गनिमी कावा (युद्धतंत्र)
गाॅड ऑफ द ग्रेट थिंग्स (माहितीपर, मराठी)
Chhatrapati Shivaji Maharaj (ऐतिहासिक, इंग्रजी)
Jijau (इंग्रजी))
नेता (राजकीय)
पानिपतचा विजय
प्राईम टाईम मॅनेजमेंट (व्यवस्थापनशास्त्र, मराठी)
मराठा क्रांती मोर्चा भविष्य आणि वाटचाल (वैचारिक)
रिच मदर रिच सन (मराठी, मार्गदर्शनपर)
वाचनाचे फायदे (माहितीपर)
शिवजयंती (शिवाजी महाराजांच्या जयंतीचा खरा इतिहास)
शिवराय (ऐतिहासिक, भाग १ ते ३)
शिवाजीचे अर्थशास्त्र (व्यवस्थापनशास्त्र)
शिवाजी द ग्रेट इंजिनिअर (व्यवस्थापनशास्त्र, मराठी)
शिवाजी द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र; मराठी, हिंदी आणि इंग्रजी)
Shivaji Maharaj (ऐतिहासिक, इंग्रजी)
शिवाजी महाराज & एम.बी.ए. (व्यवस्थापनशास्त्र)
शिवाजी महाराजांची डायरी (माहितीपर)
श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र)
सत्ता… (राजकीय)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!