ST Bus Accident

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

560 0

सोलापूर : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. सध्या सोलापूर -तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात (ST Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ही एसटी बस रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातामध्ये 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
मंगळवारी दुपारच्या सुमारास सोलापूर – तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. नियंत्रण सुटल्यानं बस रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात आदळली. या दुर्घटनेत 6 प्रवाशी जखमी झाले आहेत. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील कासेगाव परिसरात हा अपघात झाला आहे.

या एसटी बसमधून पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्यातील प्रवासी प्रवास करत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सिव्हील पोलीस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातामध्ये बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये बसचा समोरचा भाग डॅमेज झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Auto Accident : भीषण अपघात! भरधाव शाळकरी रिक्षाची ट्रकला धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नीचा अडथळा; हत्येचा कट रचला आणि..

Bageshwar Baba : पुण्यात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमस्थळी राडा; बाबाच्या स्वयंसेवकांची भक्ताला मारहाण

Drinking Alcohol : बिअर, वाईन, व्हिस्की की रम? कोणतं मद्य आहे शरीराला अधिक धोकादायक?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!