आजकाल तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आपण काही क्षणात दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (QR Code) करू शकतो. यामुळे लोकांचे जीवन खूप सोयीस्कर झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे त्यांचा टाइम वाचत आहे. मात्र असे असले तरी जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसे फसवणुकीचे प्रमाणदेखील वाढत आहे. सध्या देशात असाच एक फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. क्यूआर कोड स्कॅनच्या आधारे ही फसवणूक केली जात आहे.यामध्ये बनावट क्यूआर कोडच्या सहाय्याने फसवणूक केली जाते. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना आपण सावध असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
काय आहे QR कोड स्कॅम?
क्यूआर कोड स्कॅम एका खास पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये वास्तविक QR कोडमध्ये एक बनावट म्हणजेच छेडछाड केलेला कोड जोडलेला असतो. यानंतर जेव्हा कोणी तो क्यूआर कोड स्कॅन करतो तेव्हा तो दुसऱ्या क्यूआर कोडवर ट्रान्सफर केला जातो. ज्याच्या आधारे तुमची फसवणूक केली जाते. कोड स्कॅन करताच हॅकर्स तुमच्या डिव्हाइसचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतात. यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढून तुमचे खाते रिकामे करतात.
क्यूआर कोड कशाप्रकारे काम करतो?
फसवणूक करणारे एक क्यूआर कोड तयार करतात, जो एका लिंकशी कनेक्ट असतो. हा कोड एखाद्या प्रसिद्ध ब्रँड किंवा कंपनीचा असतो. यानंतर फसवणूक करणारे हा कोड सार्वजनिक ठिकाणी ठेवतात आणि अशाप्रकारे ते तो कोड स्कॅन करणाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढतात.जेव्हा तुम्ही अशा बनावट क्यूआर कोडला स्कॅन करता तेव्हा तुम्ही एका वेबसाइट किंवा वेबपेजला अॅक्सेस देता. ही वेबसाइट तुमची वैयक्तिक माहिती चोरी करुन तुमचं बँक खातं रिकामे करतात.
फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी
सार्वजनिक ठिकाणी असलेले QR कोड स्कॅन करणं टाळा. विशेषतः जे QR कोड विश्वसनीय नाहीत त्यांना अजिबात स्कॅन करू नका.
QR कोड स्कॅन करण्यासाठी, QR कोड स्कॅनर अॅप वापरा.
फक्त अधिकृत अॅप्सला प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करा.
मोबाईलमधील घुसखोरी टाळण्यासाठी सुरक्षा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. तसंच डिव्हाइस नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेअरसह अपडेट करत जा.
जर कोणी तुमच्याकडे ईमेल किंवा मेसेजच्या आधारे वैयक्तिक माहिती विचारत असेल तर वेळीच सावध व्हा. हा फसवणुकीचा प्रकार असू शकतो.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
SIM Card : 1 डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधीत ‘या’ नियमात होणार बदल
Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची
Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत