Rohit Sharma

WC Final : रोहित शर्मा इतिहास रचणार? वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय कर्णधाराला करता आलेली नाही ‘ही’ कामगिरी

617 0

अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला पार पडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. हा संघ आतापर्यंत अपराजित असून सलग 10 सामने जिंकले आहेत.

कर्णधार म्हणून रोहित शर्मा याने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. त्याने आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये 550 धावा केल्या आहेत. त्यामुळे आज वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही तो अशीच कामगिरी करेल अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. मात्र आजपर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शतक करता आलेलं नाही. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शतक करून हा नवा विक्रम आपल्या नावे करणार का? हे पाहाणं महत्त्वाच ठरणार आहे.

टीम इंडिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन :
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!