अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला पार पडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. हा संघ आतापर्यंत अपराजित असून सलग 10 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया 8 व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. या सगळ्यांत ऑस्ट्रेलियाच्या नावावर असा एक रेकॉर्ड आहे जो अजून कोणत्याच टीमला तोडता आलेला नाही. टीम इंडिया तो रेकॉड तोडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहे तो रेकॉर्ड?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत कोणत्याही संघाला 300 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. 1975 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम खेळताना 8 विकेट्समध्ये 291 धावा केल्या होत्या. पण हा सामना 60 षटकांचा होता. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ 274 धावाच करू शकला. वेस्ट इंडिजने हा सामना 17 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म बघता हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन :
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.