आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट (UPI Payment) करण्यात येते. जर तुम्हीदेखील ऑनलाईन पेमेंट करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. युजर्सच्या निष्काळजीपणामुळे तुमचं UPI खातं आणि UPI आयडी बंद होऊ शकतो. यूपीआय (UPI) नेटवर्क चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) वतीने, गुगत पे (Google Pay), पेटीएम (Paytm) आणि फोन पे (PhonePe) सारख्या थर्ड पार्टी यूपीआय अॅप्सना काही यूपीआय आयडी (UPI ID) आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं आहे.
NPCI ने जारी केली नोटीस
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या नोटिसमध्ये म्हंटले कि, वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत. NPCI ने UPI नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
31 डिसेंबरच्या आधी हे काम करून घ्या
NPCI ने निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे, जर युजर्सला त्याचा UPI आयडी आणि नंबर नेटवर्क बंद करायचं नसेल, तर त्याला त्याचा UPI सक्रिय ठेवावा लागेल. UPI आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना, बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना ईमेल आणि मेसेजद्वारे युजर्सना माहिती द्यावी लागेल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला
Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये पुन्हा बिघाड; डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले