Ajit Pawar

… म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर कार्यक्रमात पुढील काही दिवस सहभागी होणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

617 0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाले असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल डेंग्यूची लागण झाल्यामुळे ती पुढील काही दिवस जाहीर कार्यक्रमांना उपस्थित नसतील. दरम्यान काल बारामतीत अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा होळी पूजन कार्यक्रम होणार होता मात्र मराठा आंदोलकांच्या रोशामुळे अजित पवारांना हा कार्यक्रम रद्द करा करावा लागला व अजित पवार दिवसभर पुण्यामध्ये होते.

Share This News
error: Content is protected !!