दहशतवादी हल्ल्याने इसराइल हादरलं! 100 हून अधिक नागरिकांनी जीव गमावल्याची भीती

2252 0

इस्त्रायलच्या तीन शहरांवर गाझा पट्टीतून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पॅलेस्टानी संघटना हमासने स्वीकारली आहे. इस्रायलसह अश्कलोन आणि तेल अीव या दोन शहरांवर अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. शहरांच्या निवासी भागात हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अल्जझीराने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमधील संघर्ष फार जुना आहे. आज गाझा पट्टीतून पॅलेस्टानी संघटना हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून या पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडलं आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही युद्धात (Israel Palestine War) उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हमासने इस्रायल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या परिसराचा सैन्याने ताबा घेतला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जमा करण्यास सांगितले आहे. शत्रूला इतकी किंमत मोजावी लागेल की त्याने कधीच विचार केला नसेल.

शनिवारी सकाळी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हे हल्ले इस्रायलवर करण्यात आले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!