Ajit Pawar

अजित पवारांसोबत असणारा 42 आमदार कोण? समोर आलं हे मोठं नाव

1819 0

राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान या पार्श्वूमीवर अजित पवार गटाकडून 53 आमदरांपैकी 42 आमदार आपल्या सोबत असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगात सांगितलं आहे. मात्र हा 42 आमदार कोण याबाबत अनेक तर्क वितर्क लावले असतानाच आता एक मोठं नाव समोर आलं असून अजित पवार गटासोबत जाणारे 42 वे आमदार नवाब मलिक असणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या  जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक आता अजित पवार गटाला पाठिंबा देणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!