मनसे लोकसभा निवडणूक लढवणार; या नावांवर झालं शिक्कामोर्तब?

1541 0

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुणे ठाणे व कल्याण यासह प्रमुख लोकसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा मतदारबरोबरच मनसेकडून चेहऱ्यावर देखील चर्चा झाली असून कल्याण लोकसभेसाठी आमदार राजू पाटील तर पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांचे नाव चर्चेत आहे कोणत्या मतदारसंघासाठी कोणाचं नाव चर्चेत आहे हे पाहूयात

कल्याण लोकसभा – राजू पाटील

ठाणे लोकसभा – अभिजित पानसे/ अविनाश जाधव

पुणे लोकसभा – वसंत मोरे

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनी ठाकरे

दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर

छत्रपती संभाजीनगर लोकसभा – प्रकाश महाजन

सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे

चंद्रपूर लोकसभा – राजू उंबरकर

रायगड लोकसभा – वैभव खेडेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या नावावर शिक्कामोर्तब करणार की नवा चेहरा देणार हे पाहण्यासाठी मात्र आगामी काळाची वाट पहावी लागणार आहे..

Share This News
error: Content is protected !!