राष्ट्रवादी कुणाची; केंद्रीय निवडणूक आयोगात आजच्या सुनावणीत काय झालं

1346 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी तब्बल दोन तासांनी संपली आहे. शरद पवार आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.

अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र बेकायदेशीर आहे. मुख्य प्रतोद आमच्यासोबत आहेत, असा अजित पवार गटाने दावा केला आहे. तर निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

अजित पवार गटाकडून यावेळी एक लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली असून महाराष्ट्र विधानसभेच्या 53 पैकी 42 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असून अन्य राज्यातील नागालँड मधील सात आणि झारखंड मधील एका आमदाराचा पाठिंबा असल्याचा निवडणूक आयोगासमोर सांगण्यात आले त्याचबरोबर लोकसभेतील एक आणि राज्यसभेतील एक खासदार देखील आपल्या सोबत असल्याचे अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं तर मूळ पक्ष हा शरद पवारांचा असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी संध्यकळी चार वाजता  होणार आहे

Share This News
error: Content is protected !!