लेखक राजन खान यांच्या २८ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डेबू खान असं या मुलाचं नाव आहे.
पुण्यातील मावळच्या सोमटने फाटा येथे ही घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडल्याची माहिती समोर आली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहिली असून त्यातून आत्महत्या करण्याचे कारण समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचे तसेच त्यातून फटका बसल्याचा उल्लेख होता. तसेच पैश्यांची देवाण-घेवाण केलेल्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख होता. आर्थिक विवंचनेतून डेबूने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. या आधारावर तळेगाव पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या भावाने त्यांना जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणला असता सायंकाळी साडेसहाला डाॅ. सोनवणे यांनी मृत घोषित केले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून शवविच्छेदनानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला, अशी माहीती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.