Raj Thackeray

मनसेचं मिशन लोकसभा; राज ठाकरेंनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक

581 0

राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. भाजप, ठाकरे गट शिंदे गटासह, राष्ट्रवादी यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज कार्यकर्त्याची बैठक बोलवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी बैठक बोलावली असून, बैठकीत 20 लोकसभा मतदारसंघांची चर्चा होणार आहे.

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मोठी चूरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत. आता मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्यानं इच्छूक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Share This News
error: Content is protected !!