स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक

403 0

स्वस्तात विमानाची तिकीट काढून देतो असं सांगत एका पर्यटन कंपनीनं लाखोंचा  गंडा घातल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आर्या हाॅलिडेज कंपनीचा मालक अनिकेत दामले (रा. विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहित आबासाहेब कोतवाल (वय ३०, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोतवाल यांची पार्थ टुर्स अँड ट्रॅव्हल्स पर्यटन कंपनी आहे. कोतवाल यांच्या कंपनीकडून केदारनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दामले यांनी कोतवाल यांना पुणे ते दिल्ली विमान प्रवासाची तिकिटे कमी किंमतीत काढून देतो, असे सांगून कोतवाल यांच्याकडून सुरुवातीला एक लाख ६१ हजार ८०० रुपये घेतले. त्यानंतर विमान तिकिटाची किंमत वाढली असल्याचे सांगून त्यांच्याकडून पुन्हा दोन लाख २८ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर कोतवाल यांना दामले यांनी विमान तिकिटे दिली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!