पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिल्या होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा

190 0

देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलिवंदनानिमित्त लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. लोक वेगवेगळ्या शैली आणि पारंपारिक रीतिरिवाजांमध्ये हा सण साजरा करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा  यांच्यासह देशातील अनेक राजकारण्यांनी या खास प्रसंगी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलं की, ‘तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. परस्पर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा रंगांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाचे सर्व रंग घेऊन येवो.’

याशिवाय रंगांच्या या सणानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांच्या आयुष्यात सुख आणि शांती नांदो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रंगांचा आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, सौभाग्य आणि नवी ऊर्जा घेऊन येवो.

Share This News
error: Content is protected !!