भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट*

350 0

पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि रंगारी भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला.

ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान तसेच त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभारलेली चळवळ यासंबंधीची माहिती या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतली. यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली.

Share This News
error: Content is protected !!