अभिनेते आर. माधवन यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

3141 0

अभिनेता आर. माधवन हा एफटीआयआयचा नवा अध्यक्ष असणार आहे. त्याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आर. माधवन हा हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आत्तापर्यंत विविध हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच कन्नड सिनेमातही त्याने काम केलं आहे. १९९७ मध्ये आलेल्या इन्फर्नो या इंग्रजी सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. हिंदी, तमिळ या सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करुन माधवनने त्याचा असा खास चाहता वर्ग तयार केला आणि तो टिकवलाही. राजू हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मध्येही तो झळकला होता. तर ‘रहना है तेरे दिल मे’ सिनेमातला त्याचा रोल प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे.

Share This News
error: Content is protected !!