महायुतीत वादाची ठिणगी पडणार? अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेनं शिंदे गटाची अडचण होणार

1321 0

मुंबई: राष्ट्रवादी त उभी फूट पाडत अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले आणि भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून तयार झालेल्या महायुतीत आता वादाची पहिली ठिणगी पडली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. अजितदादा यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल करत अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही अजित पवार यांना उत्तर दिलं. वादाची ठिणगी पडल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा विषय थांबल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

शुक्रवारी झालेल्या मंत्र्यांच्या खाजगी बैठकीत अजित पवार यांचा हा आक्रमकपणा पाहिला मिळाला असून अजित पवार हे महाविकास आघाडीत असतानाही अडचण निर्माण करत होते आणि आता महायुतीतही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार करू पाहत आहे अशी भूमिका शिंदेंच्या एका मंत्र्याने देखील यानंतर घेतल्याचं पाहायला मिळालं

Share This News
error: Content is protected !!