…म्हणून शरद पवार, अजित पवारांमध्ये गुप्त भेट; सामना रोखठोकमधून संजय राऊतांनी केला मोठा दावा

789 0

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पक्षात पडले. मात्र पक्षफुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटींमुळे सर्वांमध्येच संभ्रमाचं वातावरण आहे.

महाराष्ट्राचे गोलमाल राजकारण’ या शीर्षकासह महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण आणि राज्यातील सत्तेत असलेल्या नेत्यांच्या भविष्याविषयी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे की, “पवार पुन: पुन्हा चर्चेत येत आहेत ते अजित पवार यांच्याशी सुरू असलेल्या बैठकांमुळे. अजित पवार यांनी पवारांशी राजकीय नाते तोडले. अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल.”

“शरद पवार व अजित पवार का भेटत आहेत? माझ्या माहितीनुसार या बैठका राजकीय नाहीत; तर शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती, सहकारासंदर्भात ज्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले त्या सर्व संस्थांवर अजित पवार यांना पवारांनी आणले. हजारो शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे भविष्य या संस्थांत आहे. संस्थांचे भवितव्य काय हे ठरवण्यासाठी या बैठका असाव्यात”,

Share This News
error: Content is protected !!