Breaking News

जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

1480 0

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला.

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पार्श्ववभूमीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देत त्यांना गौरविण्याचे जाहिर केले आहे.

‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजक असे अन्य तीन पुरस्कार देण्याची घोषणाही उद्योगमंत्री सामंत यांनी केली होती.

Share This News
error: Content is protected !!