Breaking News

आता HD कॉलिटीमध्ये शेअर करता येणार फोटो; व्हॉट्सॲपनं आणलं ‘हे’ दमदार फिचर

1477 0

आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट आणत असते. सर्वाधिक वापरलं जाणारं व इन्स्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वांसाठी व्हॉट्सॲप हे बेस्ट ऑप्शन आहे.

आता व्हॉट्सॲपनं आणखी एक फिचर लॉन्च केलं असून या फिचरच्या माध्यमातून यूजर्स आपले HD फोटो शेअर करू शकणार आहेत. मेटा चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये ही माहिती दिली आहे. आतापर्यंत अॅपमध्ये कॉम्प्रेस केलेला फोटो शेअर केला जात होता, परंतु आता तुम्ही त्याची क्वालिटी बदलू शकता. हे नवीन फिचर टप्प्याटप्प्याने सादर केलं जाणार आहे. यूजर्स लवकरच या फिचरचा लाभ घेऊ शकतील.

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला फोटो शेअर करताना वर दाखवलेल्या HD बटणावर क्लिक करायचं आहे. अनेकदा यामध्ये बाय डिफॉल्ट फोटो कॉम्प्रेस केला जाईल. मात्र, तुम्ही HD बटणावर क्लिक केल्यावर फोटोची क्वालिटी आणखी चांगली दिसेल.

Share This News
error: Content is protected !!