मेरा पती सिर्फ मेरा है म्हणत सीमा हैदरनं शेजारणीला दाखवला जोरदार इंगा

4885 0

पाकिस्तानि सीमा हैदरचा शेजारणीशी सोबत जोरदार राडा.

सध्या जोरदार चर्चेत असणारी आणि भारतात बेकायदशीररित्या प्रवेश घेणारी सीमा गुलाम हैदर आता पर्यंत हिने प्रेमाखातर मी भारतात आली असा बॅण्ड वाजवला मात्र आता. ती आपल्या प्रेमासाठी थेट लाईव्ह शोमध्ये भांडायला लागली आहे.

एका वाहिनीवर तिने मांडलेला उच्छाद सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मेरा पती सिर्फ मेरा है. असा नारा देणाऱ्या सीमा हैदरला तिचा नवरा सचिन याच्याबद्दल एकही शब्द वाईट बोललेले आवडत नाही. आपण पाकिस्तानातून केवळ त्याच्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झालोय, असे तिने वारंवार सांगितले आहे. पाकिस्तानात तिच्या नवऱ्याकडून होणारा अन्याय सहन होत नव्हता आणि त्याच काळात सचिनची तिची ओळख सोशल मिडियावर झाली. त्यामुळे तिला नवऱ्याच्या जाचातून सुटका करून घेण्याचा मार्ग सापडला. पण त्यासाठी तिने बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला.

सचिन आणि सीमा ज्या भागात राहतात तिथे असणाऱ्या शेजारच्या सोबत नेहमी भांडण होत असतात. तसेच शेजारी पाजारी त्यांचावर नेहमी टीका टिपणी करत असतात. यांची दोघांना जाणीव आहे. परंतु एका महिलेने लाईव्ह शोमध्ये तिच्या नवऱ्याबद्दल काही विशेषणे वापरली आणि तिचा राग अनावर झाला. त्यावरून तिने लाईव्ह शोमध्येच भांडायला सुरुवात केली. एका वाहिनीवर सीमा आणि तिची शेजारीण मिथिलेश यांची मुलाखत सुरू होती. त्यावेळी मिथीलेश हिने ‘लप्पू सा सचिन’ हा शब्दप्रयोग केला. यासोबत तिने सचिनसाठी झिंगूर असाही शब्दप्रयोग केला. त्यावरून सीमाला प्रचंड राग आला आणि माझ्या पतीबद्दल असे शब्द वापरलेले मला मुळीच आवडणार नाही, असे म्हणत तिने मिथिलेश हिच्यासोबत भांडायलाच सुरुवात केली.

माझे पती तीन तीन वर्षे देशाच्या बाहेर राहात असतील तर मी दुसरे काय करणे अपेक्षित आहे, असा सवाल सीमा हैदरने केला. त्यावर मिथिलेश यांनी आमचे सैनिक दहा दहा वर्षे देशाचे रक्षण करत असतात, तेव्हा आमच्या देशातील मुली असा मार्ग निवडत नाहीत, असे उत्तर दिले.

सीमा हैदर हिने मिथिलेश हिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपल्या पतीबद्दल लाईव्ह शोमध्ये अपशब्द वापरल्याचे कारण देऊन सीमाने कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. सीमाचे वकील एपी सिंह यांनी यासंदर्भात मिथिलेश हिला नोटीस बजावली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!