साताऱ्यातील कुडाळ-पाचवड रस्त्यावर कारनं घेतला पेट

3987 0

सातारा: साताऱ्यात जावळी तालुक्यातील कुडाळ पाचवड रोडवर म्हसवे फाट्याच्या नजीक आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक मारुती सुझुकी कारच्या बोनेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून चालत्या कार मधून चालक मयूर शिंदे यांना गाडीमध्ये काहीतरी जळाल्याचा वास आला.

त्यांनी कार चालू मध्येच थांबवली.. बघता बघता बोनेट मधून एक मोठा आवाज आला आणि चालक मयूर शिंदे यांनी चालू गाडी मधून बाहेर उडी मारली.. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले
कुडाळ पाचवड रोड वर द बर्निंग कारमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक दोन्हीही बाजूने थांबली होती..

Share This News
error: Content is protected !!