पीएमआरडीए विकास आराखड्यावर सोमवारपासून सुनावणी

551 0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या हरकती, सूचनांवर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

येत्या सोमवार (दि.14) पासून गठीत करण्यात आलेल्या महानगर नियोजन समितीकडून ही सुनावणी होईल.

‘पीएमआरडीए’ने 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. त्यावर 45 दिवसांत 61 हजार हरकती या ‘पीएमआरडीए’कडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी महानगर नियोजन समिती करणार आहे.

येत्या दि. 14 ते 16 मार्चदरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी सहादरम्यान ही सुनावणी होणार आहे. या दिवसांमध्ये रांजणगाव विकसन केंद्रामध्ये समाविष्ट असलेल्या कारेगाव, ढोकसांगवी, रांजणगाव गणपती, शिरूर या गावांकरिता ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सुनावणी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!