Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : तरुणांनी दारूच्या नशेत केलेल्या चोरीचे फुटेज पालकांपर्यंत पोहोचताच पालकांनी उचलले ‘हे’ पाऊल

609 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) उच्चशिक्षित तरुणांचा कारनामा उघडकीस आला आहे. यामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) जालन्यातील आयटीआय आणि डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांनी दारूच्या नशेमध्ये मौजमजा करण्यासाठी संभाजीनगरमधील मोबाईलचे दुकान फोडत चोरी केली. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. काही दिवसांनी हे फुटेज चोरट्यांच्या पालकापर्यंत पोहोचले. मुलांचा प्रताप बघून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्यांच्या पालकांनी थेट दोघांनाही पोलीस ठाण्यामध्ये हजर केले.

काय घडले नेमके?
अभिषेक राजू रिंढे (वय 21) आणि आदित्य सुनील उघडे (वय 19, रा. इंदेवाडी जालना) असे आरोपींची नावं आहेत. अभिषेक आयटीआयचं शिक्षण घेतो. त्याचे वडील कंपनीत नोकरीला आहेत. तर आदित्य हा डी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. त्याचे वडील कंत्राटदार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्ञानेश्वर खर्डे यांचे कॅनॉटमध्ये रेणुका टेलिकॉम अँड मल्टी सर्व्हिसेस नावाचे मोबाईल दुकान आहे.

घटनेच्या दिवशी म्हणजेच (Chhatrapati Sambhajinagar) 29 जुलै रोजी नियमितपणे रात्री मोबाईलचे दुकान बंद करून घरी गेले. यावेळी दुकानांमध्ये चाळीस हजार रुपये रोकड, दहा स्मार्ट वॉच, दहा येअर बर्ड्स, कीपॅड मोबाईल आणि पाच चार्जर असा तब्बल 95 हजार रुपयांचा ऐवज होता तो चोरीला गेला. दुकानात चोरी झाल्याप्रकरणी 30 जुलै रोजी सिडको पोलीस ठाण्यामध्ये खर्डे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर हे फुटेज आरोपींच्या घरच्यांपर्यंत पोहोचले. हे फुटेज पाहून चोरी करणारे आपलेच मुलं असल्याचे पालकांच्या लक्षात येताच पालकांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. यानंतर दोन्ही आरोपींच्या पालकांनी दोघांना सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!