पुणे : पुण्यातील (Pune Accident) कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ आज विचित्र अपघात पाहायला मिळाला. या अपघातात (Pune Accident) एक जण ठार झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये शाळेच्या बसचा देखील समावेश आहे. या अपघातामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कात्रज कोंढवा खडी मशिन रोडवर सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघाताची (Pune Accident) माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरचा (MH14 GD 6919) ब्रेक फेल झाल्याने त्याने बाकी वाहनांना धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 8 वाहनांचे नुकसान झालेले आहे. या भीषण अपघातात प्रशांत कृष्णा चोरे (वय 43 वर्षे, रा धनकवडी, पुणे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणाला ॲम्बुलन्सने ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमी इसमाना जवळील भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघात ग्रस्त वाहनांची माहिती पुढील प्रमाणे…
MH 12 DC 3278 pashion
MH 12 ET 9752 CAR
MH 12 JW 8064 PASHION PRO
MH12 MK 9387 SHINE
MH12 TV 4208 TEMPO
MH12 MV 6018 TEMPO
MH12 NE 6501 MAHINDRA CAR
MH12 UK 1449 ROYAL ENFIELD
कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघातांचं (Pune Accident) सत्र हे सुरुच आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी करूनदेखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.