Breaking News

गोव्यातून भाजपचे विश्वजीत राणे विजयी

397 0

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यातील सर्वात महत्वाचे राज्य म्हणजे गोवा.

या ठिकाणी नुकताच निकाल हाती आला आहे. गोव्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. गोव्यात वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी झाले आहेत.

गोवा विधानसभेत अपेक्षेप्रमाणे काॅंग्रेस आणि भाजपा यांच्यात काटे की टक्कर सुरू असल्याचे सकाळपासून दिसत आहे. तर तिसरा पर्याय दिणाऱ्या आम आदमी पार्टीला गोवेकरांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गोव्यातील पहिला निकाल हाती आला असून भाजपचे उमेदवार विश्वजित राणे हे विजयी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!