Sai Tamhankar

Marathi Actress : मराठीतील ‘या’ टॉपच्या अभिनेत्रींनी बोल्ड सीनच्या बाबतीत केली होती हद्द पार

772 0

मराठी अभिनेत्री (Marathi Actress) या त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये काही अभिनेत्री (Marathi Actress) अश्या आहेत ज्यांनी आपल्या बोल्ड सीनने चाहत्यांना घायाळ केले आहे. त्यांच्या या बोल्ड सीनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. चला तर मग आज आपण या आघाडीच्या बोल्ड अभिनेत्रींनबद्दल जाणून घेणार आहोत…

1) प्राजक्ता माळी (Prajakta Mali)
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे रानबाजार या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स आणि डायलॉग्स आहेत. प्राजक्ताचा रानबाजार या वेब सीरिजमधील एका बोल्ड सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.या व्हिडीओनंतर काही लोकांनी प्राजक्ताला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.

2) सई ताम्हणकर (Sai Tamhankar)
सई ताम्हणकरनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हंटर या चित्रपटात बोल्ड सीन्स दिले होते. हंटर या चित्रपटात सईनं ज्योत्स्ना ही भूमिका साकारली. या चित्रपटात सई आणि अभिनेता गुलशन देवय्या यांचे काही बोल्ड सीन्स आहेत. सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सईनं मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.

3) राधिका आप्टे (Radhika Apte)
पार्च्ड, ‘द वेडिंग गेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये राधिकाने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. तिने पार्च्ड या चित्रपटामध्ये बोल्डनेसची सीमा पार केली आहे. राधिका ही विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राधिकानं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा एक असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

4) प्रिया बापट (Priya Bapat)
प्रिया बापटनं सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन केला आहे. या सीनने सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. या सीरिजमधील प्रियाच्या किसिंग सीनची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सीरिजच्या दुसरा आणि तिसरा सीझन देखील रिलीज झाला. या सीरिजच्या 3 सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!