ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्र सरकार देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज ?… जाणून घ्या सत्यता

214 0

सोशल मीडीयामध्ये अनेक मेसेज कोणत्याही तथ्यांची तपासणी न करता फॉर्वर्ड केले जातात. त्यामुळे फेक न्यूज झपाट्याने पसरल्या जातात.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर असाच वायरल होत असलेला एक मेसेज म्हणजे भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी सार्‍या भारतीयांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देणार आहे.

दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) या ट्वीटर अकाऊंट द्वारा या वायरल मेसेजची पोलखोल करण्यात आली आहे. त्यांच्या कडून हा वायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेज खोटा आहे. अशाप्रकारे भारत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

 

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एअरटेल, जिओ आणि Vi सीम वापरणार्‍यांकरिता 3 महिन्यांसाठी ही ऑफर्स असणार आहे. त्याचा फायदा मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र हा बनावट मेसेज आहे. अशाप्रकारे अनोळखी लिंक वर क्लिक करणं धोकादायक ठरू शकतं. खाजगी माहितीवर डल्ला टाकण्याचा यामधून प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबी कडून करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!