Breaking News

माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचं निधन

1358 0

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यातील विश्वासू सहकारी आणि पुण्यातील शिवसेना वाढीसाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे (८९ वर्षे) वृद्धापकाळाने  निधन झाले आहे. घाटे यांनी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.

त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या सोमवार दिनांक 7 मार्च 2022 सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचे ते सासरे होते

Share This News
error: Content is protected !!