PM NARENDRA MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

470 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे येत आहेत. मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. तसेच पुणे महापालिकेत बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!