Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ‘कोयत्या’ची दहशत; तरुणाची थेट कोयता घेऊन कॉलेजमध्ये एंट्री

1055 0

पुणे : पुण्यातील (Pune Crime News) सदाशिव पेठेत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका युवतीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. पण ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे CA ला पडलं महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

पुण्यातील (Pune Crime News) आबासाहेब गरवारे महाविद्यालयात हा सगळा प्रकार घडला आहे. कुणाल कानगुडे असं 19 वर्षीय या तरूणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल कानगुडेचा आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॅनी यांच्याशी वाद झाला होता. त्या कारणावरून त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत पसरवली. कॉलेजमध्ये दहशत राहावी म्हणून त्याने कोयता काढला होता.

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात पुण्यातील 7 जणांचा समावेश

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यानंतर कोयता काढणाऱ्या कुणाल कानगुडे या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची कोयता काढला त्या ठिकाणापासून ते डेक्कन परिसरात धिंड काढण्यात आली. पुण्यात (Pune Crime News) कोणत्याही भाईने पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस करू नये म्हणून पोलिसांकडून कोयता काढणाऱ्या तरुणाची धिंड काढली. मागच्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्याच बरोबर पुण्यात कोयत्याची दहशतही पाहायला मिळत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!