राणे पितापुत्रांना मालवणी पोलिसांचे समन्स, ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

442 0

मुंबई- दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावले आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षांनंतर १९ फेब्रुवारीला नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक आरोप करून नवा वाद निर्माण केला होता. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. या आरोपांमुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याचे लेखी तक्रारीमध्ये म्हटले होते. त्यानंतर
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता.

याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!