पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

24110 0

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील जळत्या टँकरमधून अंगावर पडलेल्या पेटत्या इथेनॉलमुळे लोणावळा शहराजवळ अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या राजमाची या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तीन जण होरपळून मृत झाले आहेत.

सविता कैलास वरे (वय 34), कुशल कैलास वरे (वय 8) या मायलेकरांचा तर सविता वरे यांचा भाचा रितेश महादू कोशिरे (वय 18) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

जनार्दन बापूराव जाधव (वय 60, रा. घाटकोपर, मुंबई), गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी, मुंबई) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. नितीन सुखदेव सत्रे (वय 32, रा. मोगराळे, ता. मान, जि. सातारा), चंद्रकांत आप्पा गुरव (वय 49, रा. धनकवडी, पुणे), गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी, मुंबई) हे जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!