दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक गीतांजली अय्यर यांचं निधन

613 0

३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर बातम्या देणार्‍या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचं आज ७ जून रोजी निधन झाले.

गीतांजली या इंग्रजी बातम्यांच्या वृत्तनिवेदिका होत्या. 1971 मध्ये त्यांनी दूरदर्शनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले.

त्यांच्या तीन दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकर पर्सनचा पुरस्कार पटकावला होता. गीतांजली यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मिडियावर शोक व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!