बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल आणि दुरांतो एक्स्प्रेसची समोरासमोर टक्कर

514 0

ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 900 प्रवासी जखमी झाले आहेत तर 200 हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. ही ट्रेन दुपारी 3.15 वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली. बालासोर, ओडिशापासून 40 किलोमीटर दूर, बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली.आतापर्यंत 50 हून अधिक प्रवाशांना बहनगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!