ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास, जे जे रुग्णालयात दाखल

567 0

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने आज मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले आहे मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर 23 फेब्रुवारीला ईडीने नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून होत आहे. कुर्ला जमीन व्यवहारात नवाब मलिक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.

नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर

अटकेपासून ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांच्या कुटुंबावरही ईडीने आपली पकड घट्ट करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आज नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांनी दाऊदची बहीण हसिना पारकरकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराज मलिकांचाही या व्यवहारात सहभाग होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!