पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील हरकती सूचनांची सुनावणी (व्हिडिओ)

643 0

पुणे- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील सुनावणीला सुरुवात झाली असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ही सुनावणी होत आहे.

या हरकती सूचनांसाठी निवडणूक आयोगाकडून यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एक फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग आराखडा तयार झाल्यानंतर राष्ट्रवादी वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी नियमबाह्य प्रभागरचना झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार होत्या त्यानुसार आज व उद्या या प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!