महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचं निधन

497 0

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (47) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा पासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!