फिल्मी स्टाईल थरार; पाठलाग करत दरोडा टाकत चोरट्यांनी पळवल्या सोन्याच्या विटा

1163 0
  • पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी गाडीतून तब्बल सात किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदीची लूट केली.

या टोळीकडून आतापर्यंत 18 किलो चांदी आणि 11 तोळे सोने जप्त करण्यात आले तर आणखी चार किलो सोन्यापेक्षा जादा ऐवज घेऊन दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे त्यांचा शोध यवत पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत

यवत पोलिसांनी दरोडेखोरांनी वापरलेली इंनोवा गाडी देखील ताब्यात घेतली असून सबंधित सोने व चांदी हे कुरिअर ने घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेमुळे सातारा व पुणे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!